चीनला धडा शिकविण्यासाठी चीनमधून कोणतीही सामुग्री आयात करू नका;चिनी मालावर बहिष्कार टाका -  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



मुंबई :  चीन हा धोकेबाज देश आहे. धोका देऊन त्यांनी  लडाखच्या  गलवाण मध्ये भारतीय  सैन्यावर हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो.चीन ला धडा शिकविण्यासाठी एकदा चीनशी आरपार चे युद्ध लढले पाहिजे तसेच चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.त्यासाठी भारतीयांनी  चीनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. व्यापार उद्योग जगातला माझे नम्र निवेदन आहे की चीन मधून कोणत्याही  प्रकारच्या सामुग्री ची आयात
करू नका ; चीन मधून मालाच्या इम्पोर्टवर बंदी आणावी; आयातबंदी कारावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.

लडाख च्या गलवाण भागात भारतीय सैन्यावर चिनी सैन्याने कपटबुद्धीने नियोजन करून धोका देत क्रूर हल्ला केला. हा हल्ला भ्याड हल्ला होता. चिनी हल्ला भारतीय सैनिकांनी परतवून लावता आपले शौर्य सिद्ध केले. या हल्ल्यात  20 भारतीय  जवान शहीद झाले.त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नसल्याचे पंतप्रधानांनी म्हंटले आहे. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीन धोका देत राहून युद्धाची खुमखुमी दाखवीत असेल तर एक दिवस आरपार चे युद्ध लढून चीन ला कायमचा धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्य समर्थ आहे. असा ईशारा ना रामदास आठवले यांनी दिला आहे.