----------------------------------------------
(बीड प्रतिनिधी --विवेक कुचेकर) ३१ आगस्ट "भटके विमुक्त दिन" साजरा केला जातो.
३१ आगस्ट १९५२ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथिल सेटलमेंट मधुन समस्त भटके विमुक्तांची सुटका केली आणि भटके विमुक्त ख-या अर्थाने स्वतंत्र झाले. तेव्हा पासुन ३१ आगस्ट हा भटके विमुक्त दिन भारतभर साजरा केला जातो.
आज लिंबागणेश परिसरात जामखेड येथील भटक्या विमुक्त जाती अंतर्गत रायरंदगिरी करुन करमणुक करुन पोट भरणारे पालावर जिवन जगणारे कुटुंब पावसाळ्यात वादळवा-याची पर्वा न करता पोटाची खळगी भरण्यासाठी आले आहेत.
कोरोनामूळे करमणुक सोडा लोकं जवळसुद्दा येऊ देईनात :- शिंदे
------------------------------------------------ दरवर्षी येणा-या शिंदें कुटुंबियांना यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मोठ्या अडचणींच्या सामना करावा लागत आहे. करमणूक तर सोडा लोक जवळसुद्धा येऊ देईना झालेत. भिक्षा मागून पोट भरणारी गावातसूद्धा घेत नाहीत गावकुसाबाहेर पालं ठोकुन रहावे लागतंय.
मोलमजुरी साठी शेतीकाम मिळण्यासाठी हातापाया पडावं लागतंय, शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही.दरवर्षी जवळ करणारी पोटासाठी धान्य देणारी माणसं नाकं मुरडताना दिसतात. कोणाकडं बघुन जगायचं,दिवस काढायचे हाच प्रश्न पडलाय अशी खंत व्यक्त केली.
मग प्रश्न पडतो खरंच भटके विमुक्त यांना स्वातंत्र साजरा करण्यात अर्थ आहे काय??