मुकुंद रांजाणे
पाच महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लॉक डाऊन उठविण्यात आल्यामुळे पर्यटकांना प्रवेश देण्यात आला आहे.केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांना या कठीण कालावधीत अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. आजवर दस्तुरी नाक्यावरतेथील व्यावसायिकांकडून होत असलेली पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक करून अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळून माथेरानच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला गेला होता. त्यामुळे इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे. दस्तुरी नाक्यावर चोवीस तास पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक असताना त्याबाबत नगरपरिषदेने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे परंतु तसे केले जात नाही. दोन दिवसापूरता तिथे पोलीस बंदोबस्त ठेवला जातो नंतर परिस्थिती जैसे थे अशीच असते. खाजगी वाहने आल्यावर ओझवाले,घोडेवाले, रिक्षा वाले, रूमच्या दलालांच्या विळख्यात नवख्या पर्यटकांचा खूप गोंधळ उडतो जर कुणी पर्यटक घोड्यावर स्वार झाला नाही तर त्याला उद्धट उत्तरे अथवा अपमानास्पद वागणूक दिली जात होती हे प्रकार मागील काळात अनेकदा घडलेले आहेत त्यांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये आणि यातूनच माथेरानची प्रतिमा मलिन होत आहे त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेणे आवश्यक बनले आहे.
घोडा, रिक्षा, कुली आणि रूम्स याचे दरफलक लावण्यात आले की ही व्यावसायिक मंडळी हे फलक फाडून टाकतात आणि स्वतःच्या मनाप्रमाणे दर आकारणी करून स्वयंघोषित पॉईंट्स दाखवून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक करून अव्वाच्या सव्वा वसुली करीत असतात.अशा स्वार्थी,विकृत मानसिकतेमुळे दरवर्षी पर्यटकांचा भरणा कमी कमी होत आहे.
स्थानिकांच्या व्यवसायात कुठल्याही प्रकारची संघटनात्मक बांधणी नसून अंतर्गत कुरघोडी आणि प्रत्येक कामात राजकारण आणल्याशिवाय त्यांचा कार्यभार उरकत नाही. आपले पद, प्रतिष्ठा कायम आबाधित राहण्यासाठी अग्रेसिव्ह असून पदे सांभाळण्यात धन्यता मानतात.लॉक डाऊनच्या कठीण प्रसंगी कधी नव्हे ती अवघड मेहनतीची कामे करून स्थानिक युवकांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला होता. पर्यटकांची संख्या आता हळूहळू वाढत जाणार असल्याने इथल्या लॉज आणि जे काही स्थानिकांनी पर्यटकांसाठी खोल्या बांधल्या आहेत त्या इथल्या युवकांना वार्षिक भाडेतत्त्वावर दिल्यास गावातल्या युवकांना उत्पन्नाचे साधन प्राप्त होऊ शकते. परिसरातील लोक इथे येऊन धनाढ्य होत आहेत. त्यांच्या हातात व्यवसायाच्या किल्ल्या न देता भूमिपुत्रांना सामावून घेण्यासाठी सर्वांची आग्रही भूमिका असणे हे गावाचे स्वास्थ्य आणि एकोपा टिकविण्यासाठी महत्त्वाचे स्त्रोत बनले आहे. परिसरातील लोकांनी इथल्या प्रत्येक क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवल्यामुळे स्थानिक युवकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जर माथेरानकर अद्यापही एकसंध झाले नाहीत तर भविष्यात बाहेरील मंडळी राजकीय क्षेत्रात सुध्दा आपला ठसा उमटविण्यास मागे हटणार नाही.
___________________________________
मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर पर्यटक आल्यावर जे कुणीही व्यावसायिक मंजूर दरा पेक्षाही अधिक रक्कम घेत असतील अशांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे सर्व पर्यटक हे तक्रार देण्यासाठी पुढाकार घेत नाहीत एक दिवस पर्यटन करण्यासाठी येत असल्याने ते सहसा कोर्ट कचेरी या भानगडीत पडत नाहीत यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग मध्ये सातत्य ठेवायला हवे. नगरपरिषदेने काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत ते सुस्थितीत आहेत की नाही यावर संबंधित लोकप्रतिनिधीनी,प्रशासकीय अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित केले पाहिजे जर सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असतील तर नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करून आपल्या ठेकेदारांमार्फत ही प्रक्रिया पूर्ण करायला हवी.दस्तुरी येथे सर्व व्यावसायिक यांना पार्किंग मध्ये प्रवेश देऊ नये तेव्हाच पर्यटकांना या प्रवेशद्वार जवळ मोकळा श्वास घ्यायला मिळेल.
---------------------------------------------------------
Attachments area