जनहितासाठी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेला (लॉंग मार्च) उपस्थित राहून प्रसिद्धी

    जनहितासाठी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेला (लॉंग मार्च) उपस्थित राहून प्रसिद्धी             


                


                 कोरोना प्रकोपात नागरिकांच्या आरोग्य व जीवितहानीमुळे अर्थव्यवस्था हि प्रचंड विस्कळीत झालेली आहे. तरी या दरम्यान नागरिकांना होत असलेल्या विविध त्रासांत दिलासा, सुरक्षा, सुविधा आणि साधन हे  स्थानिक प्रशासनाकडून मिळावे. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनास उच्चस्तरीय शासन यांचे ध्यान अधिक केंद्रित करण्याकरीता नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेमार्फत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून लॉंग मार्च (पदयात्रा) सोमवार दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता काढण्यात येणार आहे.


                 तरी  नागरीकांचे  व्यक्ती स्वातंत्र्य आणि  स्वस्थ  जीवन  जगण्यासाठी विस्कळीत  झालेले जनजीवन पूर्वपदावर  आणण्यासाठी  व  वाचविण्यासाठी ,  आपल्या  प्रसिद्ध माध्यमातून लॉन्ग मार्च या जनहिताच्या कार्यक्रमास बातम्या व छायाचित्रांद्वारे नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्यक्ष वा  प्रतिनिधींद्वारे उपस्थित राहावे हि नम्र विनंती.


                   यापूर्वीच आम्ही आपणांस आमच्या मागण्या व सुचविलेल्या विविध उपाययोजनांचे निवेदन आपणांस दिलेले आहेच व अधिक माहिती साठी पुनश्च जोडण्यात आलेले आहे.


 


 


 


प्रति,


 मा.कोकण विभागीय आयुक्त साहेब, कोकण भवन, सीबीडी-बेलापूर,


 मा.पालिका आयुक्त साहेब, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर,नवी मुंबई.


 मा.व्यवस्थापकीय संचालक साहेब, सिडको,सीबीडी-बेलापूर,


 मा.अधीक्षक अभियंता साहेब, म. रा. वि. कं.लि, सेक्टर-१७,वाशी, नवी मुंबई.   


  


       विषय : नागरीकांचे  जीवित आणि आरोग्य तसेच  वित्त हानी जी काही झालेली आहे आणि जी काही बाकी आहे हे    


                  वाचविण्यासाठी  त्यांना  स्वस्थ  जीवन जगण्यासाठी विस्थापित झालेले नागरीकांचे जीवन  पुनर्वसन व्हावे या  


                   करीत भारतील संविधान मधील कलम २१ नुसार जीवित व व्यक्तिगत स्वतंत्र यांचे रक्षण हा कायदा    लागू करणे


                   बाबत .    


     संदर्भ :   भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियमन १८९७ अंतर्गतच्या कायद्यान्वे  विविध प्रकारचे   लॉकडाऊन व रहिवासी  


                  संकुले ,इमारती मधील नागरीकांना संचारबंदी केले . त्याबाबत चे विविध शासकीय आदेश .       


   निवेदन :  . विद्युत ग्राहकांना पूर्ण समाधान कारक दिलासा देणे .


                 २. आर्थिक स्थिती मजबुत करण्यासाठी रोजगार करीता पूर्णतः लॉकडाऊन  रद्द करून  उपाययोजना करणे .


                 . जिवीत  आणि आरोग्य , हानी  वाचविन्यासाठी  हॉस्पिटल मध्ये विविध उपचारांचे  बेडची संख्या अधिक


                      सक्षमतेने  वाढवणे .


महोदय


                  कोरोना प्रक़ोपात विविध स्वरूपातील मदत करीत असलेल्या  सर्व शासकीय , निमशासकीय , स्थानिक स्वराज्य  संस्था , स्वयम सेवी संस्था ,कंपन्या आणि समाजसेवक हे या सेवेत समर्पित झाले . नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आपले आभारी आणि अभिनंदन करीत आहे. 


                


                 कोरोना प्रक़ोपात नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था ३ मुद्यानं  बाबत . सामान्य नागरिकांच्या मनातिल तळमळ या  निवेदना  द्वारे प्रशासनाचे ध्यान केंद्रित करु इच्छित आहे. 


 


१)    विद्युत बिल : भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ अंतर्गतच्या कायदयाने  गेले ४ महीने नागरीकांना घरी बंदिस्त  केले / राहिले / स्वीकारले आणि    हाज़ारो नागरीकांची जिवीत  व आरोग्य हानिचे पूर्ण रक्षण केले . पण लाखों  नागरिकानांचे पूर्ण रोज़गार संपुष्टात आले त्यामुळे  रहिवासी आणि कमर्शिअल यांच्या  कडे  विद्युत बिल भरण्यास पैसेच शिल्लक राहिले नाही. अशा   रहिवासी आणि कमर्शिअल घटक यांचे निवेदन.  असे



  1.       a) सदर  देण्यात  आलेल्या बिलात ५०० युनिट्स पर्यंत  सरसकट माफ करणे . 

  2. b) सदर ५०० युनीच्या वरील वाढीव बिल मध्ये ५० % सूट द्यावी . 

  3. c) अथवा मागिल डिसेंबर , जानेवारी आणि फेब्रूवारी महिन्यातिलच  बिल गृहीत धरून त्या वर ५०%  सरसकट सूट देणे. 

  4. d) ज्या ग्रहाकांना ऑनलाइन मुळ बिल दिले आहे आणि ग्राहकांनी  ते ऑनलाइन पेमेंट केलेही आहे . परंतु त्यांना  नंतर  


             पुन्हा वाढ़िव बिल दिली आहेत ती त्वरित रद्द करावी.        



  1. e) ज्यां ग्राहकांनी बिल भरलेली आहेत अशा  ग्राहकांना मुद्दा क्रमांक a आणि b नुसार लागू करुण पूढिल  बिलातुन वजावट


            (adjustment )करावी .



  1. f) बिल पेमेंट भरने हे ३ हप्त्यात (टप्यात ) करणे. 

  2. g)नागरीकांची आर्थिक स्थिति रुळावर येत नाही तो पर्यंत विद्युत पुरवठा खंडित करु नये.                           


 


२) अर्थ व्यवस्था :   रोज़गार न करु शकलेले , रोज़गार गमावलेले आणि नवीन रोज़गार शोधार्थी असे अकुशल    , आर्ध कुशल ,     


    कुशल आणि व्यापारी , उद्योजक अशा या विविध लाखों श्रमिकांवर आता भूख बळी आणि प्रसंगी आत्महत्या  होण्याची वेळ


    येऊ नये  . तरी त्या नागरिकांची जीवित  रक्षण व्हावे असे.      


      



  1.   a)पार्ट पार्ट  लॉकडाऊन सहित  पूर्णता: रद्द करावे आर्थात बीगेन आनलॉक , हॉट स्पॉट , p१ p२ , आणि ठराविक वेळ  


              असे काहीही बंधन नसावे .  



  1.  b)रहिवास संकुल अथवा इमारती मधील  कोरोना पॉज़िटिव बाधित फ्लॅट अथवा रूम या  व्यतिरिक्त पूर्ण ईमारत /


               संकुल बंदिस्त करु नये . ज्या  अर्थी त्या लाखो श्रमिकांना स्वतःच्या रोजगारापासून आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 


               घटकांना त्या सेवांपासून  वंचित ठेऊ नये . 



  1.       c)ठीक ठिकाणचे रस्ते बंधिस्त केल्याने आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेवर परिणाम होत आहे , तरी सर्व रस्ते खुले  करावे .

  2. d) नागरीकांना मूलभूत जगण्याचे हक्क प्रधान करा आणि कोरोना व इतर आजारांच्या उपचार करीता प्रथम  हॉस्पिटल 


             मध्ये  बेडची संख्या वाढवावी . 


 ३) कोरोना उपचार : कोरोना संसर्गातुन प्राण आणि आरोग्य हानी बचाव करिता अंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय ,   राज्य आणि स्थानिक 


     स्वराज्य  संस्थां यांच्या  मानांका नुसार    कोरोना वायरसचे संभाव्य  धोके, समस्या ,त्याबाबतचे  प्रतिबंध  , प्रसिद्धि ,      


     प्रबोधन,  जाहिरात,  उपाय , नियोजन आणि उपचार असे  सर्व    विविध शासकीय यंत्रणांन मार्फ़त सेवा देत आहात            .   


      तरीही नागरीकांना   वेळेत सुलभ  उपचार आणि  मोफत उपचार व्हावे या  बाबत नागरीकांचें   कळकळीचे निवेदन. असे     


      



  1.   a)दैनंदिन  कोविड भय रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. त्या ऐवजी दिलासा दायक  ( PDF ) रिपोर्ट रोजच्या दिवसातून ३


             वेळा प्रसिद्ध करावे.  ज्या मध्ये   ,कोविड व नॉन कोविड रुग्णांना  उपलब्ध   असलेले   व केलेले उपचार बेडची संख्या   


             पुढील प्रमाणे अशी की ,  डिस्पेन्सरी, रहिवास आणि   कमर्शिअल ,  स्वतंत्र  भूखंड, वैद्यकीय महाविद्यालय आणि


              महानगरपालिका या सर्व हॉस्पिटल  मधील उपचार बेडची शिल्लक  स्थिती दर्शकता दर्शवावी . ज्या अर्थी  बाधित न


              झालेले १५ लाख    नागरीकांना उपचाराची शाश्वती मिळेल .तसेच    बाधित झालेले हजारो नागरीकांना दिलासा


              मिळेल . अशा या दोन्ही घटकांच्या  प्राण  व आरोग्याचे  रक्षण   तसेच   आर्थिक  सक्षम  होण्यासाठी मानसिक बळ 


               मिळेल आणि ते भय मुक्त व्हावेत    .     b)  कोरोना बाधितांना त्वरित वेंटिलेटर , ऑक्सिजन , आणि मध्यम उपचार करिता हॉस्पिटल मध्य बेड त्वरित  उपलब्ध


              करावे .                



  1.   c)महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत  कोविड  आणि नॉन कोविड रुग्णाचे  उपचार हे सर्वच खाजगी हॉस्पिटल


             मध्ये   मोफत व्हावेत .  प्रथमतः  लिस्टेड असलेले  खाजगी हॉस्पिटल मध्ये  त्वरित आंमलबजावनी  करावी. तसेच


             उर्वरित सर्वच हॉस्पिटल या योजनेत लिस्टेड करावे. पालिकेची सनियंत्रण कमिटी आंमलबजावनी  कमिटी  अधिक सक्षम   


             व्हावी. ज्या अर्थी   नागरीकांना   या योजनेचा सहज आणि सुलभ पद्धतीने लाभ घेता येईल .    



  1. d) दिनांक - २६-०६-२०२० रोज़ीच्या पत्रा नुसार   कोविड  आणि नॉन कोविड या विविध सूचना


     केलेले आहे ते पत्र सोबत  जोडत आहे .                                                                                        


             


               नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेने वेळो वेळी प्रशासनास  नम्र निवेदना  द्वारे विविध सूचना कळविण्यात आल्या आहेत. ज्या आर्थी नागरीकांचे वरिल ३ ही मुद्दे हे जीवन मरनाचे आहेत. त्यांची  उचित आंमलबजावनी त्वरित  व्हावे या बाबत प्रशासनाचे  ध्यान केंद्रित करून नागरीकांना दिलासा द्यावे .          


   


 


 माध्यमातून   पूढिल ७ दिवसात वाशी शिवाजी चौक ते मा . अधीक्षक अभियंता सेक्टर -१७ वाशी , मा . विभागीय आयुक्त कोकण भवन आणि   पालिका आयुक्त नवीन मुख्यालय बेलापूर  यांच्या कार्यलया पर्यंत सोशल डिस्टंससह संस्थेचे प्रमुख सहकारी यांस सोबत लॉंग मार्च करणार याची  आपण नोंद घ्यावी .प्रथमतः नागरी  सुविधा आणि जीवन विस्कळीत  झालेलेच आहे.  तरीही  या दरम्यान होणार्य विविध नागरी  सुविधांच्या परिणामाला वरिल सर्व प्रशासन जबाबादर असेल .


     


           तरी सदर निवेदन नागरकांच्या सहानभूत पूर्व अंमलात  अनावे.


 


                                                                                                            आपले स्नेहांकित


                                                                                                   


                                                                                                         दशरथ सिताराम भगत


                                                                                                 माजी - विरोधी पक्ष नेते , न.मुं.म.पा.


                                                                                             अध्यक्ष - नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक  संस्था 


प्रत सहकार्यासाठी -


मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब ,मुख्यमंत्री / महाराष्ट्र राज्य मुंबई,


मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब , विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र शासन,


मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री-ठाणे जिल्हा,


मा. श्री. राजेशजी टोपे साहेब, आरोग्यमंत्री-महाराष्ट्र राज्य,


मा. श्री. राजन विचारे साहेब, खासदार-ठाणे लोकसभा क्षेत्र,


मा. श्री. प्रविणजी दरेकर साहेब , विरोधी पक्ष नेते ,विधान परिषद, महाराष्ट्र राज्य,


मा. श्री.गणेशजी नाईक साहेब, माजी पालकमंत्री - ठाणे जिल्हा, आमदार- ऐरोली विधानसभा,


मा.श्रीम. मंदाताई म्हात्रे, आमदार-बेलापूर विधानसभा,