लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको व्यवस्थापन यांच्यात सिडको भवन येथे बैठक संपन्न.

प्रतिनिधी :    आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2020 रोजी सिडको भवन मध्ये संघर्ष समिती व सिडको अधिकारी यांच्यात सिडको संपादित जी प्रकल्पग्रस्त गावे आहेत त्यांना तातडीने नागरी सोयी सुविधा पुरवाव्यात त्यामध्ये, रस्ते, गटारे, समाज मंदिर, मैदान, जलकुंभ, जिम, हॉस्पिटल, शाळा, या सारख्या सुविधा तातडीने कम्पलसरी  या सर्व गावांना द्याव्यात असे आजच्या बैठकीत ठणकावून सिडको अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. यावर सिडको अधिकारी यांनी सांगितले कि आम्ही लवकरच सर्वेक्षण करून या नागरी सुविधा लवकरात लवकर पुरवणार आहोत.


   त्याच बरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आजच्या बैठकीत संघर्ष समिती कडून  मांडण्यात आला. तो म्हणजे विमानतळ बाधित जे प्रकल्पग्रस्त आहेत कि ज्यांच्या दगड खाणी या प्रकल्पा साठी गेल्यात त्यांना पर्यायी जागा जो पर्यंत सिडको देत नाही. तो पर्यंत ज्या ठिकाणी त्यांना दगड खाणी काढण्या साठी परवानगी दिली आहे ती त्याच ठिकाणी चालु ठेवावी त्यांना पर्यायी जागा लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी सिडको कडे करण्यात आली त्या वर बोलतांना सिडको अधिकारी यांनी सांगितले  लवकरात लवकर आम्ही त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत आहोत.


तिसरा मुद्दा या बैठकीमध्ये मांडण्यात आला तो म्हणजे द्रोणागिरी भूखंड वाटण्याचे  वाटप तातडीने करण्यात यावे.


त्याच बरोबर नेरुळ उरण रेल्वे मार्ग, उरण बेलापूर हायवे या ठिकाणी च्या शेतकऱ्यांचे भूखंडाचे वाटप राहिलेत आहे. ते ताबडतोब विकसित करून देण्यात यावे .


चौथा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीने मांडण्यात आला तो म्हणजे JNPT प्लॉट संदर्भात. यामध्ये JNPT आणि सिडको यांच्यात जो MOU(करार ) झालेला नाही तो ताबडतोब  पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यात यावा. या वर सिडको MD यांनी सांगितले कि आम्ही लवकरच हेकाम  पूर्णत्वास नेत आहोत.


त्याच बरोबर MTHL जे  प्रकल्पबाधित आहेत त्यांना सुद्धा लवकरात  लवकर न्याय देण्यात येईल असे सांगण्यात आले.


आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आज संघर्ष समितीच्या वतीने मांडण्यात आला तो म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जो  मास हाऊसिंग प्रकल्पआहे कि जो  महाराष्ट्र शासन सिडको च्या मदतीने खारकोपर स्टेशन, कामोठे मानसरोवर, तळोजे या ठिकाणी उभारणार आहे. याला सर्वपक्षीय संघर्ष समितीने कडाडून विरोध केला आहे. कारण सिडको हा प्रकल्प जी आरक्षित खेळाची मैदाने आहेत. रेल्वेस्टेशनं आहेत या ठिकाणी उभारत आहेत. त्या जागेला समितीचा विरोध आहे. तो प्रकल्प त्यांनी इतर भूखंडावर निर्माण करावा परंतु ज्या लोकांची वर्षानुवर्षे गरजे पोटी बांधण्यात आलेली राहती घरे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे हात लाऊ नये. जी खेळाची मैदाने आहेत ती तशीच आरक्षित करावीत त्यांना हात लाऊ नये अशी रोख ठोक भूमिका आज समितीने मांडली.


यावेळी सिडको अधिकारी यांनी मासहाऊसिंग प्रकल्पाचे प्रेझेंन्टेशन समितीला दाखवण्यात आला हा प्रकल्प कुठल्या जागेत बसणार आहे, त्याचे स्वरूप कसे असणार आहे. हे सांगण्याचा प्रयत्न सिडको अधिकारी यांनी केला मात्र याला संघर्ष समितीने आक्षेप घेतला आणि सांगितले कि आम्ही या विषयावर जनतेशी चर्चा करू आणि मग आमचा निर्णय देऊ.


त्याच बरोबर सिडको कोविड हॉस्पिटल साठी 10कोटी रुपये देणार आहे ते लवकरात लवकर तातडीने देण्यात यावे आणि या ठिकाणी केवळ कोविड चा विचार न करता कायमस्वरूपी एक सुसज्य हॉस्पिटल प्रकल्पग्रस्त आणि येथील जनतेसाठी बांधावे याचा आढावा आजच्या या बैठकीत घेण्यात आला.


आजच्या या बैठकीला लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती कडून समितीचे अध्यक्ष माजी खासदार मा. श्री रामशेठ ठाकूर साहेब, उपाध्यक्ष मा श्री. बबनदादा पाटील, आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर, आमदार श्री बाळाराम पाटील, माजी आमदार श्री  मनोहरशेठ  भोईर, सचिव श्री महेंद्रजी घरत साहेब, काँग्रेस चे जेष्ठ नेते आणि पनवेल जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष श्री R. घरत साहेब,माजी नगराध्यक्ष J. M म्हात्रे साहेब उपस्थित होते तर सिडको कडून सिडको चे व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्रासाहेब , सह व्यवस्थापकीय संचालक श्री. अशोक शिनगारे साहेब,सह व्यवस्थापकीय संचालक श्री. नागनवरे , मुख्य अभियंता , विमानतळ श्री. डायटकर, श्री. मुख्य अभियंता उलवे श्री. गोडबोले, मुख्य अभियंता रेल्वे चौतालिया, मुख्य नियोजन कार श्री. मानकर, भूसंपादन अधिकारी श्री. अजिंक्य पडवळ उपस्थित होते.


2 Attachments


 


 









 

ReplyReply allForward