लिंबागणेश ,पोखरी,पिंपरनई शेतक-यांची तलाठ्यांच्या मदतीने लुट करणारी टोळी कार्यरत, नावावर कमी जमिन दाखवुन पैशाची लुबाडणुक--डॉ ,गणेश ढवळे

 















लिंबागणेश ,पोखरी,पिंपरनई शेतक-यांची तलाठ्यांच्या मदतीने  लुट करणारी टोळी कार्यरत,  नावावर कमी जमिन दाखवुन पैशाची लुबाडणुक--डॉ ,गणेश ढवळे

( बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) बीड तालुक्यातील लिंबागणेश सर्कल मधिल लिंबागणेश तलाठीसज्जाचे तलाठी पगारे यांच्या मार्फत शेतक-यांच्या आनलाईन सातबारामध्ये फेरफार दाखवून क्षेत्र कमी दाखवले जाते. नंतर त्याला भिती दाखवुन क्षेत्र पुर्वीप्रमाणे करून देतो म्हणुन त्याला ५००० रु.पासुन १५००० रु.पर्यंत रक्कम उकळली जाते आणि नंतर पुर्वीईतके क्षेत्र नावावर आनलाईन दाखवले जाते. अशाप्रकारे तलाठी पगारे यांच्या मदतीने लिंबागणेश , पोखरी व पिंपरनई येथिल शेतक-यांची फसवणुक केली जात आहे, याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री बीड यांना तक्रार दाखल केली आहे.

 

१५ गुंठे जमिनीची ४ गुंठेच शिल्लक राहिली , तलाठ्याने सहीशिक्के खोटे असल्याचे लेखी दिले :- सुदर्शन,सचिन बबनराव वाणी बंधु

----------------------------------------------.. आम्हा दोघांभावांच्या नावावर मुळ कागदपत्रात  गट नं. १२७ मध्ये १५.५ गुठे जमिन आहे, मात्र पगारे तलाठी आल्यानंतर आमच्या नावे फक्त ५.५ गुंठे एवढीच जमिन आनलाईन दाखवत आहे. फेरफार मध्ये १५ ऐवजी सुरूवातीचा १ कमी केलेला आहे.डां.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी १२ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते तेव्हा निवेदन घेण्यासाठी आलेले नायब तहसिलदार श्रीराम बेंद्रे यांनी प्रत्यक्ष जागेची पहाणी करून तात्काळ दुरूस्ती करून देणृयाचे आदेश मंडळ आधिकारी जायभाये आणि पगारे तलाठी यांना दिले होते. 

 

आस्तित्वात नसलेली बोअरवेलसह बागायती जमिन, रजिस्ट्रीमधील कागदपत्रावर  सह्या व सहिशिक्के माझे  नाहीत:- पगारे तलाठी

----------------------------------------------

तलाठी पगारे यांनी रजिस्ट्री मध्ये दिलेल्या सातबारा,पिकफेरा या कागदपत्रावरील  सही शिक्का माझा नसल्याचे लेखी लिहुन दिले आहे. 

विशेष म्हणजे या आस्तित्वात नसलेल्या २० गुंठे जमिनीवर बोअरवेल आणि बागायती जमिन दाखवली आहे.

 

आस्तित्वात नसलेल्या २० गुंठे जमिनीची रजिस्ट्री करून दिली त्याचे एक नव्हे तर तिनदा फेर

----------------------------------------------- गट नं. ३८९ मध्ये दि. १७/०२/२०२० रोजी रजिस्ट्री क्रमांक ७५५ ,दुय्यम निबंधक -२ यांच्याकडे    ज्या २० गुंठे जमिनीची रजिस्ट्री करून दिली आहे ती जमिनच आस्तित्वात नाही, जमिनीला दिशा दाखवताना दक्षिणेला सचिन बबन वाणी, उत्तरेला मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्ग, पुर्वेला दर्गा आणि पश्चिमेला उद्धव वाणी यांची शेती दाखवली आहे, प्रत्यक्षात या ठिकाणी २० गुंठे जागा आस्तित्वातच नाही.या जागेचे एकदा नव्हे तर तिनदा फेर खालील तारखेला करून दिले आहेत 

१)दि. २४/०२/२०२० रोजी

फेर क्रमांक १९१८

२) दि. ०१/०६/२०२० रोजी फेरक्रमांक १९४५

३) दि. ०३/०६/२०२० रोजी फेरक्रमांक १९४५

 

भोगवटा नंबर बदलुन शेततळे खोदले :- डां.सुदर्शन वाणी

----------------------------------------------

शासकीय मुळकागद पत्रानुसार गट नं. १६४ मध्ये भोगवटा क्रमांक १ मध्ये जमिन असताना ग्रांमपंचायतने तलाठी पगारे यांच्याशी हीतसंबध जपत त्याचे भोगवटा क्रमांक २ केले आहे. त्यामुळे अवैधरित्या ती जमिन तहसिल प्रशासनाच्या ताब्यात दाखवुन १०-१२ शेततळे खोदले आहेत.

 

भालचंद्र रखमाजी वायभट, कमी क्षेत्र केल्यामुळे पिककर्ज कमी ,

----------------------------------------------

गेल्यावर्षी माझ्या नावावर गट नं २९२,२९३,२९४. अंतर्गत  ४७००० रू पिककर्ज मिळाले होते. यावर्षी मला महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखाधिकारी जगताप यांनी केवळ २० ०००रू पिककर्ज मंजुर केले. याविषयी विचारणा केली असता तुमचे क्षेत्रफळ कमी झाल्याचे सांगितले , आनलाईन पाहणी केली असता माझ्या नावावर ५१.५ गुंठे क्षेत्रफळाऐवजी ३४.५० गुंठे जमिन आनलाईन दाखवत आहे. त्यामुळे मी तलाठी यांना यासंबधी विचारणा केली असता १ महिना लागेल दुरूस्तीसाठी असे सांगितले जात आहे. मी मात्र तलाठ्याच्या हलर्गजीपणामुळे आर्थिक संकटात सापडलो आहे.

 

तलाठी पगारेच्या मदतीने स्थानिक टोळी कार्यरत, संघटीत गुन्हेगारी कारवाईसाठी जिल्हाधिका-यां मार्फत मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्य

डां.गणेश ढवळे लिंबागणेशकर:- 

------------------------------------------------ लिंबागणेश तलाठी सज्जा अंतर्गत लिंबागणेश ,पोखरी, पिंपरनई गावातील मोठ्या प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र कमी दाखवून नंतर तलाठी आणि त्यांच्या सहकारी यांनी  ५०००रु पासून १५००० रु पर्यंत प्रति शेतक-यांची    आर्थिक लुबाडणुक केली असुन याप्रकरणी चौकशी करण्यात यावी व संबधित दोंषीवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी डां.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१३/०८/२०२० गुरूवार रोजी सकाळी १० वा.लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन  करण्याचा ईशारा डां.गणेश ढवळे यांनी दिला आहे.


 

 



 



 















ReplyForward