(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) .१ ऑगस्ट२०२० रोजी बीसेफ प्रणित श्रमण संस्कृती संघाचे अध्यक्ष दत्ता कसबे यांनी आपल्या कूटूंबियांसमवेत बीड येथील निवासस्थानी जागतिक तत्ववेत्ते अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंतीचे आयोजन केले . यावेळी दत्ता कसबे यांच्या पाठबळाने आंबूज पेंटींग चे जनक पंकज जाधव यांनी जागतिक तत्ववेत्ते अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीच्या निमित्ताने सूमारे १८२०२० एक लक्ष ब्याऐंशी हजार वीस इतके दगडी खडे वापरून अण्णाभाऊ साठेंचे पोर्टेट साकारले . १८२०२०ही संख्या म्हणजे अण्णाभाऊंची १०० व्या जयंतीची तारीख असून हे पोर्टेट साकारण्यासाठी २०x३० चौरस फूट आकाराची ताडपत्री , २० लिटर काळा - पांढरा रंग इ . साहित्य वापरण्यात आले .कोरोनाचे संकट व पावसाचा व्यत्यय येऊन देखील सर्व कुटूंबियांच्या सहकार्याने तब्बल १० तास श्रम करून पंकज जाधव यांनी हे जमिनीवरील पोर्टेट यशस्वीरित्या साकारले . क्रांतीची मशाल पेटवून व फूलांचा वर्षाव करून अण्णाभाऊंना अभिवादन केले . यावेळी अण्णाभाऊ साठे दलितमित्र राजाराम जाधव , माजी सरपंच माणिक कसबे , प्राचार्या विदयाताई अवघडे , जिल्हा उद्योग केंद्र च्या मयुराताई कसबे, डॉ. शूभम पाटोदेकर , प्रा .डॉ . शामल जाधव , धम्मग्रंथ वाचक कु .सह्याद्री , कु . आर्या , कु . गार्गी , विश्वनाथ पाटोदेकर , अॅड . सुनिता जाधव , अॅड .दनियाल जाधव , कवयित्री कावेरी कसबे, शाईबाई जाधव आदि कुटूंब सदस्य उपस्थित होते .