मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांच्याकडून वरिष्ठांसह तक्रारदाराची दिशाभूल डॉ.गणेश ढवळे यांनी केली ग्रामविकास मंत्रालयाकडे तक्रार

मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांच्याकडून वरिष्ठांसह तक्रारदाराची दिशाभूल
डॉ.गणेश ढवळे यांनी केली ग्रामविकास मंत्रालयाकडे तक्रार
कुंभार साहेब, कागदपत्रे वाचून सह्या करीत जा!;प्रतिलिपीमध्ये सोबतचे पुरावे कोठे आहेत?
 (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)बीड: येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी तक्रार करून उपोषणाचा इशारा दिल्यानंतर स्वच्छ भारत मिशनच्या अपहाराने अनागोंदी कारभाराबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कक्ष अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. या संदर्भात 3 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता. या प्रकरणी कक्ष अधिकारी आणि डॉ.ढवळे यांना दिलेल्या खुलाशात मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी प्रत्येक मुद्यावर चुकीच्या पध्दतीने विश्‍लेषण करून कनिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे ईमेलव्दारे तक्रार केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, जलस्वराज प्रकल्प 2 मध्ये गेवराईचे सहायक लेखाधिकारी चव्हाण व परळीचे अवचार यांची नियुक्ती करण्यात आली होती. हा प्रकल्प 30 जून 2020 लाच संपला असून यांच्या सेवासमाप्त करण्यात आल्या आहेत असा खुलासा केला असला तरी प्रत्यक्षात हे दोन्ही कर्मचारी पंचायत समितीमध्ये नेमके काय करत आहेत. याचा खुलासा मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी केला नाही. आजही लाखो रूपयांचे बिले उचलण्याचा प्रकार चालू असल्याचे स्थानिक सांगत आहेत. पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या जिल्हा कार्यालयात कंत्राटी सहायक लेखाधिकारी उगले यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती शासन निर्णयानुसार करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे.त्यानुसार 11/8/2014 ला उगले यांना नियुक्ती दिली.त्यानंतर अकरा महिन्याच्या कालावधीनंतर मुदतवाढ देण्यात आली. म्हणजे गेल्या सहा वर्षामध्ये त्यांना एकही कायम अधिकारी या पदासाठी मिळाला नाही काय? याचे उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी द्यावे. गेवराई पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी चव्हाण यांच्या विरूध्द अफरा तफरीच्या कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी पत्रात म्हटले आहे. हे जर खरे असेल तर मग गटविकास अधिकार्‍यांच्या तक्रारीवरून जिल्हा कार्यालयातील अधिक्षक नवले हे नेमके गेवराईला कशासाठी गेले होते? गेवराई काय पर्यटन स्थळ आहे का? याचाही खुलासा कुंभार यांनी केला पाहिजे. गटविकास अधिकार्‍याकडून कुठलीही तक्रार आपल्याकडे आली नाही असे या पत्रात म्हटले आहे. मग गटविकास अधिकारी बागुल यांनी केलेली तक्रार कोणी दाबली याची चौकशीही कुंभार यांनी करावी. या तक्रारीवरून चव्हाण यांची चौकशी केली त्याचा अहवाल कोठे आहे? याचाही शोध कुंभार यांनी घेतला पाहीजे. कुंभार यांनी खुलाशात म्हटले आहे की, गेवराई पंचायत समितीचे समुह समन्वयक शेख एम.आर.व श्रीमती यु.एस.कदम यांना कारणे दाखवा नोटीसा दिल्या. या नोटीसाचा खुलासा श्रीमती कदम यांनी दिला असेल तर तो गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते चाळक यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवल्यानंतर हा खुलासा त्यांना का दिला नाही.जर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे यांनी रांजणीची चौकशी केली नाही आणि त्यांना तेथे काहीच अपहार आढळला नाही मग ते पंचायत समिती येथे गेल्यानंतर शेख आणि कदम गायब का झाले? आणि दुसर्‍या दिवशी गुपचूप कोणाला भेटले याचाही खुलासा कुंभार यांनी करावा. उगले यांचे काम समाधानकारक आहे तर स्वच्छ भारत मिशनचा फंड गेवराई तालुक्याला झटपट कसा मिळतो? आणि इतर तालुक्यांना झुलवत का ठेवले जाते. वारंवारं मागणी करूनही इतर तालुक्यांना फंड का दिला नाही. गेवराईत काय विशेष होते याचा खुलासाही कुंभार यांनी केला पाहिजे. याची कसून चौकशी केली तर कुंभार यांची या प्रकरणात दिशाभूल होतेय का? असा संशय येत आहे.कोणत्या तालुक्याला किती पैसे दिले याचा सविस्तर अ्रभ्यास केला तर गेवराईत काय चालले आहे हे पाहून कुंभार यांचे डोळे पांढरे होतील. मात्र कुंभार यांना कसलीही चौकशी करायची नाही. त्यांना अधिकारी,कर्मचार्‍यांना पाठीशी घालायचे आहे हेच या पत्रावरून दिसून येत आहे.