-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) सविस्तर माहितीसाठी:- लिंबागणेश ते घारगांव व्हाया काटवटेवस्ती डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२ जुलै रोजी मांजरसूंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच आंदोलनापुर्वीच रस्त्यांचे काम सुरू झाले आहे, याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
महादेव ढास :- घारगांव सरपंच
------------------------------------------------ पेपरमध्ये रास्ता रोको आंदोलनांची बातमी आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पासुन रस्त्यांचे काम सुरू झाले आहे, नळकांडी पुलाला सुरूवात झाली आहे, दर्जेदार रस्ता होईल याची काळजी घेऊ.
सुनिल येडे:- अंजनवती सरपंच
-----------------------------------------------घारगाव ते काटवटेवस्ती ते लिंबागणेश या रस्त्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. विनायक मेटे, आ. संदिप क्षीरसागर तसेच कार्यकारी अभियंता बेदरे, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांना लेखी निवेदन दिले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला रास्ता रोको आंदोलन करावे लागले होते. आता दोन दिवसांपासून रस्ता काम सुरू केले आहे.
राजेभाऊ काटवटे:- काटवटे वस्ती
------------------------------------------------ पूर्वी ठेकेदाराने प्रस्तावित टेंडरप्रमाणे काम न करता काटवटेवस्ती रस्ता वगळून काम सुरू केले होते,ते ग्रांमस्थांनी अडवले होते, त्यानंतर डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश बसस्थानक येथे करण्यात आले होते. आता पुन्हा आंदोलनाचा इशारा देताच काम सुरू झाले आहे.
जोगदंड:- अभियंता, ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड
----------------------------------------------
दोन दिवसापासून घारगांव ते लिंबागणेश रस्ते कामास सुरुवात केली आहे, दोन महिन्यांत नळकांडी पुलांची व खडीकाम अगोदर पुर्ण करण्यात येईल. व दिवाळीपूर्वी डांबरीकरण करण्यात येईल. त्यामुळे ऊद्या दि. २जुलै रोजी आपला रास्ता रोको आंदोलन रद्दबातल करावे ही विनंती आहे.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
-------------------------------------------
१२ मार्च रोजी लिंबागणेश बसस्थानक येथे मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. तत्कालिन तहसिलदार किरण आंबेकर यांनी निवेदन स्विकारत रस्ता पावसाळ्यापूर्वी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पावसाळा सुरू होऊन हि रस्ता काम सुरू न केल्याने ग्रामस्थांचे गुडघाभर चिखलातून जाताना हाल होत होते, शेवटी पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा लिंबागणेशकरांनी दिल्यानंतर आंदोलनाच्या दोन दिवसांपूर्वी रस्ता कामास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत घारगांव ते काटवटे वस्ती ते लिंबागणेश हा ६.८ कि.मी. चा रस्ता असुन प्रस्तावित किंमत ४ कोटी ८७ लाख रुपये आहे. रस्ताकाम सुरू केल्याने व सहा महिन्यांत डांबरीकरणासह रस्ता पुर्ण करण्याचे आश्वासन अभियंता जोगदंड यांनी दिल्याने तूर्तास रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.