डॉक्टर जितीनदादा वंजारे यांना सर्पदंश

.
       (बीड प्रतिनिधी-- विवेक कुचेकर) 11 जुलै 2020 रोजी रात्री अकरा वाजता दवाखान्यात रुग्णांस उपचार करण्यासाठी डॉक्टर जितीनदादा वंजारे हे गेले असता सलाईन संपण्यास उशीर झाला म्हणून ते रात्री त्यांच्या खालापूरी गावातील क्लिनिकलाच थांबले असता रात्री पलंगावर झोपेत असताना कॉमन क्रेट या तांबूस काळा व अंगावर पांढऱ्या पट्या असणाऱ्या विषारी सापाने दंश केला .रात्री सुमारे 2:00 ते 2:30 दरम्यान ही घटना घडली.
           खालापूरी गावात वैद्यकीय व्यवसाय करणारे खालापूरी चे भूमीपुत्र मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर हे आपल्या शेतात राहतात  व त्यांचे क्लिनिक घरापासून एक किमी अंतरावर आहे .जाण्यासाठी रस्ता नाही ,चिखल,माती ने पाऊस पडल्यावर रस्ता बंद असतो गाडी जात नाही अश्या परिस्थितीत रुग्णांना  emergency (तात्काळ सेवा)  देण्यासाठी त्यांना रात्री अपरात्री यावे लागते आणी येण्यासाठी त्या रस्त्याशिवाय पर्याय नाही म्हणून रात्री उशीर झाल्या कारणाने डॉक्टर दवाखान्यातच थांबले असता त्यांना रात्री अडीच च्या सुमारास सर्पदंश झाला .झोपेत असताना सापाने चावा घेतला.सर्पदंश झाल्याचे समजताच डॉक्टर जितीनदादा वंजारे यांनी मित्रांना व नातेवाईकांना फोन केला आणी त्यांना तात्काळ उपचारा साठी बीड येथे एका खाजगी हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले .यावेळी त्यांनी अर्जुन डोके,दत्तामामा  परजने,गोरख वंजारे,संजीवनी वंजारे यांनी सहकार्य केले आणी तात्काळ बीड येथे उपचारासाठी नेण्यात आले.
             बीड जिल्यातील राजकीय क्षेत्रातील सत्ताधारी नेत्यांनी या घटनेची दखल घेऊन त्यांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा जेणेकरून रुग्णांना  जलद व योग्य वेळी उपचार करण्यास मदत होईल कारण खालापूरी परिसरात रात्री अपरात्री उपचार करणारे ते एकमेव डॉक्टर आहेत.त्यामुळे रस्त्याचे काम झालेच पाहिजे असे आव्हाहन त्यांच्या मित्राच्या वतीने करण्यात आले.