*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे पनवेल मध्ये आदरांजली.!*






*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे पनवेल मध्ये आदरांजली.!* 

 

आज दिनांक १८ जुलै २०२० रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .सदर प्रसंगी  पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष श्री किशोर देवधेकर सर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कोरोनाच्या पाश्वभूमीत लॉकडाऊन असल्यामुळे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून निवडक पदाधिकारींच्या उपस्थित सदर कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर सर, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष श्री मनोज जगनीत ,उपाध्यक्ष हर्षद लोखंडे, जिल्हासचिव  गणेश पाटील, गोविंद मोरे , प्रभाग अध्यक्ष राहुल अडांगळे, धनाजी सोनावणे, सचिन पांचाळ,संदिप खुरे, आदी प्रमुख उपस्थित होते