लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय संघर्ष समितीची बैठक JNPT चे डेप्युटी चेअरमन श्री उन्मेष वाघ साहेब यांच्या सोबत संपन्न -


 


       आज गुरुवार  दिनांक 2 जुलै 2020 रोजी लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय संघर्ष समिती ची बैठक JNPT चे डेप्युटी चेअरमन श्री उन्मेष वाघ साहेब यांच्या सोबत JNPT प्रशासन भवन (ऍडम )बिल्डिंग मध्ये पार पडली.


    हि बैठक  तब्ब्ल दोन वर्षांनी होत आहे. त्यामुळे JNPT व सिडको कडे अनेक प्रश्न  प्रलंबित आहेत. तेव्हा हे प्रश्न  लवकरात लवकर मार्गी लावून ते निकालात काढावेत अशी मागणी सर्व पक्षीय समितीने आजच्या बैठकी मध्ये केली आहे.


    या मध्ये प्रामुख्याने JNPT 12.5% वाटपाचे काम आहे. JNPT ला सिटी डेव्हलोपमेंट चा अनुभव नसल्याने ते काम सिडको कडे देण्यात आलेलं आहे.या डेव्हलोपमेंट कामासाठी   सिडको ला JNPT कडून 418 कोटी देणे गरजेचे आहे. ते आपण लवकरात लवकर देऊन हा प्रश्न मार्गी लावावा व लोकांना लवकरात लवकर नागरी सुविधा द्याव्यात  त्याच बरोबर वाढीव रक्कमेचे वाटप सुद्धा लवकरात लवकर करावे, हि प्रामुख्याने मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली आहे.


      या प्रश्नावर बोलतांना JNPT चे डेप्युटी चेअरमन श्री उन्मेष वाघ साहेब म्हणाले की आम्ही लवकरात लवकर सिडको कडे 12.5% चे 418 कोटी जे  चार्जेसआहेत तेआम्ही  वर्ग करत आहोत. वाढीव रक्कमे चा प्रश्न सुद्धा येत्या नजीक च्या काळात लवकरात लवकर सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच बरोबर आता पर्यंत JNPT प्लॉट ची किती लॉटरी काढली किती प्लॉट वाटप केले गेलेत आणि राहिलेले प्लॉट ची लॉटरी सुद्धा लवकरात लवकर काढली जाईल याची माहिती त्यांनी आजच्या या बैठकी मध्ये समितीला दिलीआहे.  त्याचबरोबर इतर जे काही प्रलंबित प्रश्न आहेत. त्यासाठी JNPT,  सिडको,  आणि लोकनेते दि. बा पाटील साहेब  सर्व पक्षीय संघर्ष समिती यांची लवकरात लवकर एक जॉईंट मिटिंग घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन डेप्युटी चेअरमन साहेबांनी आजच्या बैठकीत दिले. आजची बैठक हि खुप खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्मक झाली.


      या बैठकी साठी लोकनेते. दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय संघर्ष समिती च्या वतीने समितीचे अध्यक्ष माजी खासदार मा श्री. रामशेठ ठाकूर साहेब, मावळ चे खासदार मा. श्री श्रीरंग बारणे साहेब, उपाध्यक्ष श्री बबनदादा पाटील , आमदार श्री प्रशांतदादा ठाकूर, आमदार श्री. महेश बालदी, माजी आमदार श्री. मनोहरशेठ भोईर, कामगार नेतेआणि समितीचे सचिव  श्री महेंद्रशेठ घरत, JNPT विश्वस्त श्री भूषण पाटील, श्री दिनेश पाटील, समितीचे निमंत्रक श्री अतुल पाटील या वेळी उपस्थित होते.