[20:49, 03/07/2020] Dainik Lokankit: केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी ३ जुलै २०२० रोजी देशातील सर्व राष्ट्रीय संघटनांनी असहकार आंदोलन पुकारला होता . या आंदोलनामधे इंटक हि जगातील सर्वात मोठी संघटना सुद्धा सहभागी होती . न्यु मेरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना हि इंटक संघटनेशी संलग्न आहे . न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव श्री . महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण , पनवेल , नवी मुंबई येथिल विविध अस्थापना व कंटेनर टर्मिनल येथे कामगारांनी उस्फूर्तपणे केंद्र सरकारच्या कामगार विरोधी उदा . कामगार कायदे रद्द करणे , कामाचे तास वाढविणे , कामगारांना लॉकडाऊच्या काळातील पूर्ण पगार न देणे . आयकर लागू नसलेल्या कामगारांना मासीक ७५०० रूपये मदत करावी यासाठी निषेध करण्यात आला . या निषेध आंदोलनावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष पि.के. रामण , सरचिटणीस वैभव पाटील , उपाध्यक्ष मुरलीधर ठाकूर , विनोद म्हात्रे , किरीट पाटील , संजय ठाकूर , परशुराम भोईर , जयंवत पाटील , आनंद ठाकूर , अरूण म्हात्रे , लंकेश ठाकूर , रोहित घरत , विवेक म्हात्रे , राजेंद्र भगत आदित्य घरत , अरूण पाटील , प्रांजल भोईर , आदिनाथ भोईर , अमित म्हात्रे , आकाश ठाकूर , संपत जाधव , औदुंबर सुर्वे , अजित ठाकूर , सुजित म्हात्रे , अमोल ठाकूर , आशिष तांडेल , अंगत ठाकूर , चंद्रकांत ठाकूर , शशी भोईर , कल्पना ठाकूर , वैशाली घरत , पुष्पा पाटील , आंनदी पाटील , रेवती परब , कमला ठाकूर , ध्यानुबाई भगत , रजनी ठाकूर व इतर कामगार मोठया संख्येने उपस्थित होते .