[02:27, 16/07/2020] कुचैकर बिड: द्रढ निश्चयी बना,ध्येयवेड्या माणसाला कसलीच अडचण येत नाही ...डॉ.जितीनदादा वंजारे.
जीवन क्षणभंगुर आहे.जीवन नाशवंत देहाच्या कुबड्यावर टेकून बसलेले असते आणी नाशवंत वस्तू चिरकाल टिकणारी मुळीच नसते म्हणून या मृगजळ आयुष्यात नाशवंत देहाची किंवा कुबेराच्या धनाचा कोणीही गर्व किंवा लालसा करू नये.पण आपण यात एक मात्र नक्कीच करू शकतो जेकि आपल्या हातात आहे ते म्हणजे 'शुद्ध अंतःकरण,कपटरहित मन आणी साफ नियती' आणी याच गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या आहेत.त्या कश्या ते पाहू, एक साधारण जगणारा माणूस असतो तो जमेल तेव्हढं जेमतेम कमावतो आणी खातो म्हणजे पोटापुरत कमावतो आणी खातो त्याच कुटुंब अगदी छान जीवन जगत असत एके दिवशी त्यांच्याकडे त्यांचा जुना वर्ग मित्र भेटायला येतो साहजिकच त्यांच्या मुलाने त्यांना विचारले पप्पा हे कोण आहेत ? आणी आपल्याकडे बारबार का येतात ? ते खूप श्रीमंत आहेत,त्यांची गाडी खूप छान आहे,पप्पा आपल्याला पण घ्याना अशी गाडी ? असे अनेक प्रश्न त्या मुलाने आपल्या बापाला विचारले यावर त्यांनी एकच उत्तर दिले ती गाडी, त्याच घर, त्याच कुटुंब, एव्हढं सगळं छान असेल तर तो माझ्याकडे बारबार का येतात बर ? यातच त्याच उत्तर आहे बाळा.... ! मुलगा कारणमीमांसा करू लागला त्याच्या तर्क बुद्धीला ते आवडल नाही त्याने त्वरित उलट प्रश्न विचारला पप्पा ते कस ? सांगा बर .त्यावर त्याचे वडील म्हणाले हे जे भौतिक सुख आपल्या डोळ्यांनी दिसतंय ना ते सुख नसून महामाया आहे यात आडकलेला प्रत्येक माणूस मकडीचा जाळ्यात आपल्या कोमल पंखांना खोलवर अडकून बसलेल्या कीटकाप्रमाणे आहे. हे जर परम सुख असत तर या अफाट दुनियेत हा माणूस कोठेही फिरला असता पण आपली मानस, आपला समाज, आपल गाव,आपला तालुका, आपला जिल्हा, आणी आपला राज्य,देश, आपल जग हे जे 'आपलेपणा' आहे ना हा तो जपण्यातच एक वेगळाच परम आनंद असतो आणी तो याने हेरला आहे .आज त्याजवळ सगळं आहे पण हे जमवताना त्याने सगळं 'आपलेपण' गमावले आहे आणी तेच शोधण्यासाठी तो माझ्याकडे बरबार येतो.आपल्या बापाच हे उत्तर एकूण प्रचंड मोठ्या आणी जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरे त्या छोट्या मुलाला मिळाली शिवाय स्वतःच्या बापाबद्दल आदर आणी सम्मानही त्याच्या मनात निर्माण झाला.आपली गरिबी आपला सम्मान आणी आपलेपणा यातच समाधान मानत तो मुलगा खेळण्यास घरा बाहेर पडला.
तर मित्रानो झालं असं, काल परवा माझ्या आयुष्यात एक घटना घडली,तारीख11 जुलै 2020 ला हॉस्पिटल चे बांधकाम चालू होते थोडी डागडुजी करून संडास - बाथरूम बांधकाम चालू होते विटा अस्ताव्यस्त पडल्या होत्या, भिंत कामगारांनी पाडली होती आणी नेमकं त्याच जागेतून एक तीन ते साडेतीन फूट लांबीचा काळसर तपकीरी व पांढऱ्या रेषा असणारा कवड्या नाग आत आला.मी कामाने थकलो होतो घरी गेलो आणी जेवायला बसायचं कि एक कॉल आला डॉक्टर अर्जंट हॉस्पिटल ला या मी बायकोने वाढलेलं ताट बाजूला सारल आणी तात्काळ हॉस्पिटल ला आलो आणी पेशंट ला पाहून घरी आलो जेवन केल आणी आराम करण्यासाठी निघालो तोच एक कॉल आला डॉक्टर साहेब अर्जंट हॉस्पिटल ला या माझी आईचे अंग गार पडले आहे एकाकी तिला चक्कर आली आहे मी तात्काळ हॉस्पिटल ला आलो रुग्णाला तपासले असता,लो शुगर होती आणी लो बीपी पण होता.मी तात्काळ आय.व्ही. लावले योग्य उपचार केले रुग्ण होश मध्ये आला हे सगळे होउतोवर पावणे दोन वाजले होते.माझे घर शेतात आहे.घरापासून माझ हॉस्पिटल साधारण एक किमी अंतरावर आहे आणी जाण्यासाठी चांगला रस्ता नाही,मधेच नदी आडवी आहे आणी चिखल मातीचा रस्ता आहे त्यामुळे मी चार वाजेपर्यंत हॉस्पिटल लाच थांबण्याचा विचार केला दरम्यान दिवसभर कामाच्या व्यापाने मी थकलो होतो त्यामुळे मला झोप लागली. त्यातच कुस बदलत असताना माझा हात भिंतीवर आलेल्या त्या कवड्या नागावर पडला आणी त्याने मला दोनदा चावा घेतला.मी तात्काळ झोपेतून उठलो आणी पाहतो तर पुढे चवताळलेला साप.मग मी त्याला पकडायचं सोडून उपचाराला महत्व दिले.हॉस्पिटल मधेच असल्या कारणाने पटकन एक सलाईन ची नळी कापली ती एका हाताने चावा घेतलेल्या हाताला काही अंतरावर बांधली आणी एक सिरिंज च पुढच टोक कापून सक्षन तयार केले व विष बाहेर खेचले.हॉस्पिटल ला एकटाच असल्या कारणाने मला मदत करायला कोणी नव्हते मी स्वतःला सावरलं घाबरलो नाही.साप आहे तिथंच होता मी त्याला पाहत पाहत माझ काम करत होतो सर्पमित्र असल्या कारणाने मला त्याला मारायचे नव्हते पण पकडून दूर सोडायचे होते म्हणून काठी शोधली पण सापडली नाही.मग मी घरी आईला फोन केला तात्काळ आई आणी वडील आले.जास्त लोकांना सांगून गोंगाट करण्यापेक्षा फक्त एका मित्राला फोन केला अगोदर तीन चार जणांना फोन केले कोणीच उचलला नाही नंतर अर्जुन डोके नावाच्या माझ्या बालवर्गमित्रl ला फोन केला तो तात्काळ आपल्या भावासह तिथे हजर झाला आणी मग स्कॉर्पिओ मध्ये चालक दत्तामामा परजने,माझी आई संजीवनी वंजारे,आणी मित्र अर्जुन डोके यांनी मला हॉस्पिटल ला आणले तात्काळ उपचार चालू झाला मी ठणठणीत होतो,आहे आणी असणार आहे .मला फारसा त्रास झाला नाही कारण साप चावल्यावर मी घाबरलो नाही तात्काळ चावलेल्या हाताला वर घट्ट बांधले आणी एका कापलेल्या सिरिंज ने साप चावलेल्या ठिकाणावर घट्ट पकडून मागे ओढले,सक्षन तयार झाल्यामुळे विष बाहेर आले .पण काही काळाने पोटात तीव्र कळा उमटल्या मला अस्वस्थ वाटलं,डॉक्टर जाजू सर एव्हड्या रात्री माझ्या उपचारासाठी आले तात्काळ मला एस.व्ही.ए (snake venom antiserum) चढवण्यात आल.मला पूर्ण अंगावर rash आले.त्यांनी इतर औषधी दिले rash कमी झाले.सकाळ पर्यंत मी बरा झालो.मला सायंकाळी जनरल वार्ड ला शिफ्ट केल आणी आता मी एकदम ओके आहे.एकंदरीत सांगायचं हेच कि शारीरिक व्याधी एकाच्या दुसऱ्याला उसन्या देता कींवा घेता येत नाहीत.केलेल्या सामाजिक कामाचं प्रारब्ध कोणाला उसने देता किंवा घेता येत नाही.तुमचंच तुम्हाला कामी येणार त्यामुळे प्रत्येकाने समाजासाठी काहीनाकाही तरी केलच पाहिजे.आणी हेच एक माणूस म्हणून आपल काम आहे असं मला वाटतं .आयुष्य एखाद्या पशु प्रमाणे जगण्यापेक्षा माणसाप्रमाणे जगा. नाते फक्त मशीन व रोबोट प्रमाणे कामापुरते न वापरण्यापेक्षा ते मनापासून जपा.माणुसकी हाच एकमेव धर्म पाळा आयुष्यात चांगल्या कामांची नक्कीच समाज दखल घेतो आणी निसर्गाच्या नियमानुसार जेव्हडे द्याल तेव्हढंच मिळेल एव्हाना त्यापेक्षाही जास्त मिळेल हा निसर्ग आहे इथे सर्वकाही शक्य आहे.तो क्षणात सिमेंट ची जंगल उध्वस्त करू शकतो,आफ्रिकेत लागलेल्या आगीला तुमची टेक्नोलोजि काहीच करू शकली नाही तुमच हेलिकॉप्टर ती आग कित्येक दिवस विझवू शकल नाही तेच काम निसर्गाने क्षणात एकच पावसात केले म्हणून सांगतो निसर्गपेक्षा कोणीच मोठा नाही .त्यामुळे वसुंधरा वाचावा.निसर्ग वाचवा.पर्यावरण वाचवा.नाते जपा नाते टिकवा एव्हढंच बोलून थांबतो जय हिंद .....! जय मानवता ......!
...... मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030