बीड प्रतिनिधी :- काल परवा एक घटना घडली राजग्रहावर एका मनुवादी गिधाडाने हल्ला केला कुंड्या फोडल्या ,काचा,फोडल्या,दगड मारली एव्हढं सगळं फक्त एका सडक्या मानसिकतेतून घडू शकते यामागे मोठ षडयंत्र असू शकते त्यामुळे सगळ्याच आंबेडकरी कुटुंबियांना झेड प्लस सुरक्षा द्यावी व शासनाने महामानव ,बोधिसत्व ,विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वच ऐतिहासिक स्थळांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते विवेक कुचेकर यांनी या पत्रकाद्वारे केली.
दिवसेंदिवस दलित अत्याचाराच्या घटना वाढत आहेत ,बौद्धांची ऐतिहासिक स्थळ नेस्तनाबुत केली जातात,त्यांची नासधूस केली जातेय ऐतिहासिक स्थळांना सुरक्षा नाही,तसेच आंबेडकर घराण्याला पण सुरक्षा हवी आहे असे आम्हाला वाटते म्हणून करिता शासनाने बौद्धांची प्रेक्षणीय स्थळे,ऐतिहासिक स्थळे आणी आंबेडकर घराण्याला सुरक्षा द्यावी आणी हा जो राजगृहावर हल्ला झाला त्या आरोपीला फाशीची शिक्षा देऊन आंबेडकरी जनतेला न्याय द्यावा अशी विनंती आम्ही या पत्रकाद्वारे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना करत आहोत.सरकार नेमकं मूग गिळून गप्प का आहे गृहमंत्र्याला दलितांवरील अत्याचार अन्याय दिसतो कि नाही.अशी असणारी परिस्तिथी असताना मुख्यमंत्री पण गप्प आहेत पुरोगामी महाराष्ट्राच्या मोठमोठ्या गप्पा मारणारे सगळेच नेते आत्ता कुठे गेले स्वतःला जाणते नेते म्हणणारे आता यावर का बोलत नाहीत त्यामुळे आपण आपल्या नेत्यांना पाठिंबा द्यायला हवा असेही या द्वारे सर्व आंबेडकरी जनतेला आम्ही सांगू इच्छितो .
त्या हरामखोर तोडफोड करणाऱ्याला अटक करा,सर्व बौद्धांची आस्था असणाऱ्या स्थलांना सुरक्षा द्या तसेच डॉक्टर बाबासाहेबांच्या सर्वच कुटुंबियांना झेड प्लस सुरक्षा द्या असे आव्हाहन वंचित बहुजन आघाडीचे बालाघाट नेते विवेक कुचेकर यांनी केले आहे.