सविस्तर माहितीसाठी :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम २०१९ मध्ये बीड जिल्ह्यातील दि. भारतीय कृषि विमा कंपनी लि.मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात आली, त्यांनी बीड जिल्ह्यातील एकुण ६३ मंडळापैकी केवळ २२ मंडळ शेतक-यांना कापूस आणि तुर पिकविमा मंजूर केला आहे तर चक्क ४१ मंडळ यातुन वगळली आहेत. बालाघाटावरील शेतक-यांचे मुख्य पिक कापूस आणि तुर असल्यामुळे आणि त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची आशा बाळगणा-या शेतक-यांमधे विमा कंपनीने फसवणुक केली असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पिकविमा कंपन्यांनी फसवल्याची
----------------------------------------
पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री,
-----------------------------------------
सामाजिक न्याय तथा पालकमंत्री
--------------------------------------------
बीड यांना तक्रार :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
--------------------------------------------
बीड तालुक्यातील राजुरी नवगण , लिंबागणेश,नाळवंडी,पाली , बीड,चौसाळा, म्हाळसजवळा ,मांजरसुंभा, नेकनुर पेंडगांव, पिंपळनेर, ,या मंडळातील ,
बालाघाटावरील शेतक-यांचे कापूस आणि तूर हेंच दोन नगदी पिके घेत असुन त्यातूनच पाळी, पेरणी ,खत, बि-बियाणे यासाठी त्यांचाच उपयोग होतो.अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कापूस व तुर उत्पादक शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यातच विमा कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पंतप्रधान, केंद्रिय कृषीमंत्री, मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी तक्रार ई-मेलद्वारे पाठवली आहे.