यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून स्थानिक कामगार , परप्रांतीय कामगारांना न्याय व मदत देण्यासाठी आपल्या सहका - यांसह प्रचंड काम केले . हजारो परप्रांतीय कामगारांना शिजवलेले अन्न पुरविले व मास्क पुरविले तर स्थानिक कामगारांना सॅनिटायझर , मास्क , अर्सेनिक अल्बम - ३० होमीयोपैथीक गोळया पुरविण्यापासून , पासेस काढून देणे व सर्व कंपन्यामध्ये जाऊन सोशल - डिस्टंसिंग व सुरक्षिततेच्या उपायांची पहाणी केली . त्यामुळे कंपन्यामध्ये काम करीत असलेल्या हजारो कामगारांना महेंद्रजी घरत देवदुतासारखे वाटू लागले व याचा परिणाम म्हणून शेकडो कामगरांनी या काळात न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्विकारले . तर लॉकडाऊनमध्ये कंपन्यांना कामगारांची वानवा भासत असताना गावोगावी जाऊन बेरोजगार युवकांना मार्गदर्शन केले व रिक्त जागेवर काम करण्यासाठी राजी केले . यामुळे जवळ - जवळ ३०० युवकांना नवीन रोजगार मिळवून देण्यात ते यशस्वी झाले . कामगार नेते महेंद्र घरत यांच्या बरोबर अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज असल्यामुळे न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेने लॉकडाऊनच्या काळात सुद्धा जोरदार मुसंडी मारत न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना हीच रायगड व नवी मुंबई मधील अव्वल संघटना आहे , हे दाखवून दिलेले आहे . कामगार क्षेत्रात भिऊ नका आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत हा संदेश दिलेला आहे . पंजाब कॉनवेअर द्रोणगिरी , येथिल मे . कॉनकेअर मरीन सहीसेस मधील ६० कामगारांनी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे . संघटनेच्या नामफलकाचे अनावरण दि . ११ जून २०२० रोजी करण्यात आले . या प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष- पि . के . रामण , सरचिटणीस- वैभव पाटील , उपाध्यक्ष- किरीट पाटील , विनोद म्हात्रे , संजय ठाकूर , मुरलीधर ठाकूर , सचिव परशुराम भोईर , जयवंत पाटील , आनंद ठाकूर , तसेच संघटक- लंकेश ठाकूर , आशिष तांडेल , प्रांजल भोईर , विवेक म्हात्रे , उमेश भोईर , हरेश दमडे , अरूण पाटील , विजय पाटील , सम्राट पाटील व कॉनकेअर मरीन सहीसेस चे प्रसाद तांडेल , अनंत ठाकूर , अजित म्हात्रे , रोशन पाटील , स्वप्निल तांडेल , कल्पेश पाटील , हेमंत तांडेल , अनिकेत पवार , राजाराम नाईक , आकाश तांडेल व इतर कामगार उपस्थीत होते .