महापुरुषांच्या स्मारकांची दुरावस्था,
--------------------------------------------
नगरपालिकेचं दुर्लक्ष, नागरीकांमध्ये
-------------------------------------------
संतप्त भावना, जिल्हाधिका-यांना
-----------------------------------------
लेखी तक्रार :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
सविस्तर माहितीसाठी:- कोटयावधी रुपयांची इमारतीसाठी खर्च करणा-या बीड नगरपालिकेला महापुरुषांच्या स्मारकाकडे लक्ष देण्यास वेळ नसून कोट्यावधी रुपयांचा मलिदा रस्ते व ईतर कामांमध्ये शोधणा-या नगराध्यक्षांना स्मारकाच्या दुरुस्तीचा खर्च झेपत नाही का??असा संतप्त सवाल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या समर्थकांना पडला आहे, याविषयी लेखी तक्रार डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांनी धिकारी बीड, नगराध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका बीड यांना ई-मेलद्वारे केली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
---------------------------------------------
कोनशिला गायब
---------------------------------------------
बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आण्णाभाऊ साठे चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा असुन त्या स्मारकाची कोनशिला गायब झाली आहे, स्मारकाची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समर्थकांमध्ये तिव्र नाराजी आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाची पडझड
----------------------------------------------
विद्यमान नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ०२/०८/२००४ रोजी सुद्धा न.प.अध्यक्षच होते. तत्कालिन उपमुख्यमंत्री मा. छगन भुजबळ यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.जयसिंगराव गायकवाड तर प्रमुख उपस्थिती म्हणुन तत्कालिन ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग. जयदत्तजी क्षीरसागर आणि मा.सौ.केशरकाकु क्षीरसागर,माजी खासदार व आ.सय्यद सलिम होते, व्हि.बी.निलावाड मुख्याधिकारी,नगर परिषद बीड,. मारोती गायकवाड उपाध्यक्ष , न.प.बीड होते.
या पुतळ्याच्या स्मारकाचे ग्रनाईट पडझड झालेल्या अवस्थेत आहे. जर नगरपालिकेला स्मारकाच्या दुरूस्तीचा खर्च झेपत नसेल तर आम्ही वर्गणी गोळा करून स्मारक दुरुस्ती करण्याची परवानगी देण्यात यावी असे लेखी निवेदन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड, नगराध्यक्ष, नगरपालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी न.प.बीड यांना दिले आहे.
डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर
मो.नं.९४२००२७५७६